पाकिस्तान येथील सिंध प्रांतात एका मुलीने आपल्या कुटुंबातील 13 जणांचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी मुलीने आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या जेवणात विष मिसळून त्यांची हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने मुलीला तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्याने हे भयंकर कृत्य घडले.
...