⚡मुंबई आणि पुण्यात उद्या ढगाळ वातावरण; संध्याकाळच्या सुमारास पाऊस हजेरी लावणार
By Abdul Kadir
मुंबई आणि पुणे शहरात उद्या ४ जून २०२६ रोजी हवामानात मोठा बदल होणार आहे. हवामान विभागाने (IMD) दोन्ही शहरांसाठी यलो अलर्ट जारी केला असून दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे.