पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार निवडणुकीची संस्थात्मक अखंडता नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या सचोटीला जाणीवपूर्वक मोडीत काढणे हा थेट राज्यघटना आणि लोकशाहीवर हल्ला असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे.
...