प्रयागराज मध्ये होणाऱ्या महाकुंभ 2025 मध्ये अनेक मोठे सेलिब्रिटीदेखील सध्या गंगेत जाऊन स्नान करत आहेत. रविवारी, 26 जानेवारी रोजी प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमने त्रिवेणी संगमावर स्नान केले आणि या पवित्र कुंभ मेळ्याचा भाग बनली. बॉक्सर मेरी कोमने प्रयागराजमधील जत्रेचा आनंद लुटला. नेहमी ऊर्जेने भरलेली मेरी गंगेच्या काठावर धावताना आणि कॅमेऱ्याला पोज देताना दिसली. ती म्हणाली की, ती हिंदू संस्कृती आणि परंपरांचा आदर करते आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथे आली आहे.
...