न्यायाधीशांनी संन्यासीसारखे जगावे आणि घोड्यासारखे काम करावे, असंही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटलं आहे. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही मौखिक टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाचे हे खंडपीठ मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन महिला न्यायिक अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याच्या प्रकरणाची सुनावणी करत होते.
...