⚡Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षण विमान कोसळले, वैमानिकाचा जागीच मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
गुजरातच्या अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यात गुजरातमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.