नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. या कंपन्या भारतासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशात निकृष्ट दर्जाची उत्पादने विकत असल्याचे बोलले जात आहे. नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन ऍक्सेस टू न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह (एटीएनआय) ने आपल्या अहवालात हे उघड केले आहे की नेस्ले, पेप्सिको आणि युनिलिव्हर सारख्या कंपन्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनांना आरोग्य रेटिंगमध्ये कमी गुण मिळाले आहेत, असा अहवाल बिझनेस स्टँडर्डने दिला आहे.
...