मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गुरुवारी कार आणि खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर इतर आठ जण जखमी झाले. तलैनचे स्टेशन इन्चार्ज मेहताब सिंग ठाकूर यांनी सांगितले की, तरुण आणि त्याची बहीण परीक्षा देण्यासाठी कारने शुजालपूरला जात असताना हा अपघात झाला. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुजालपूर-पाचोर रस्त्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास कार आणि बसची धडक झाली.
...