उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील कचवान पोलीस स्टेशन हद्दीतील कटका गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला मागून धडकल्याने 10 मजुरांचा मृत्यू झाला. तीन मजूर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताबाबत मिर्झापूरचे एसपी अभिनंदन म्हणाले की, रात्री एक वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा बॉर्डरवर जीटी रोडवर अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.
...