दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान झाले तर आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ५८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर १२ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. या निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय हालचाली आणि राजकीय स्पर्धा तीव्र होणार आहे.
...