बीड आणि धुळे जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड येथील शासकीय विश्रामगृहात जात असताना मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीड नगरपालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे नितीन मुजमुले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
...