हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम असलेला महाकुंभ मेळा यावर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती (अदृश्य) यांच्या पवित्र संगमावर डुबकी मारून मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाणाऱ्या या भव्य जत्रेत देश-विदेशातील लाखो भाविक सहभागी होत आहेत.
...