काँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारीएन.एम. विजयन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे आमदार आय.सी. बालकृष्णन यांना शनिवारी अटक करण्यात आली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या चौकशीनंतर बालकृष्णन यांच्या अटकेची नोंद करण्यात आली, परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
...