इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना महिन्यातून 10 दिवस ऑफिसला येण्याचे सांगितले आहे. कर्मचार्यांची लवचिकता आणि वर्क फ्रॉम होमची मागणी लक्षात घेता फक्त 10 दिवस ऑफिसला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इन्फोसिसच्या रोस्टरमध्ये सुमारे 3,23,000 कर्मचारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे 'सिस्टीम इंटरव्हेन्शन'ची रचना सहकाऱ्यांमध्ये प्रभावी सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे, तसेच त्यांना लवचिकता ही देण्यात आली आहे, असे सांगितले आहे.
...