मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू मागचे कारण जैन धर्मात केले जाणारे नवकार्सी असल्याचे सांगितले जात आहे. मृताचे नाव अमित चेलावत असल्याचे सांगितले जात आहे. अमित चेलावत व्यवसायाने केमिस्ट होते. चेलावत यांना बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी इंदूरमधील अभय प्रशाल येथे बॅडमिंटन खेळत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.
...