तामिळनाडूमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन, चेन्नई आणि सालेममध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सोमवारी दिली. सध्या दोन्ही बाधितांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली. तामिळनाडू सरकारच्या डीआयपीआरने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा नवीन विषाणू नाही आणि हा विषाणू 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला होता.
...