हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नायब सिंग सैनी पुन्हा एकदा भाजप सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळ्यात नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नायब सिंग सैनी यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. पंचकुलामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार असून, तेथे सुमारे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
...