गोव्याच्या दौऱ्यात एका व्यक्तीने आणि त्याच्या मैत्रिणीला नुकत्याच सहन कराव्या लागलेल्या त्रासाची माहिती रेडिटवर दिली. या व्यक्तीने सांगितले की, ते ११ जानेवारीपासून नागाव येथील हॉटेल वाइब्स इन मध्ये राहत होते. सुरुवातीला मालमत्तेचा केअरटेकर सालेम अहमद चांगला माणूस वाटत होता. मात्र, शेवटच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारीला त्यांना अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागले. या व्यक्तीने दावा केला की त्यांनी चेक आऊट केले होते परंतु हॉटेलच्या कॉमन एरियामध्ये त्यांची बॅग ठेवली होती.
...