छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोकणी लेखक उदय भेंबरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी लेखकाच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. लेखकाने माफी मागावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. मात्र, लेखकाने अद्याप केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही.
...