मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत कृषी अभियांत्रिकी संबंधित तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेतल्या जात नव्हत्या, कारण या विषयांची पुस्तके मराठीत उपलब्ध नव्हती. पण आता अभियांत्रिकी शिक्षणाला मराठी भाषेत परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे या विषयांची पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध होतील.
...