भारतातील अनेक राज्यांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवले असून, देशात भूकंपाचे प्रमाण वाढत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी मध्यम तीव्रतेचा भूकंप आला होता. दरम्यान, आज सकाळी बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले असून 5.1 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप उपसागरात आला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला असून त्याचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात 19.52 अंश उत्तर अक्षांश आणि 88.55 अंश पूर्व रेखांशावर होता.
...