नेपाळमध्ये शुक्रवारी पहाटे ६.१ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला असून बिहार, सिलिगुडी आणि भारतातील इतर शेजारच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काठमांडूपासून पूर्वेला ६५ किमी अंतरावर सिंधुपालचौक जिल्ह्यातील भैरवकुंड येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप देखरेख व संशोधन केंद्राने दिली. नेपाळच्या मध्य आणि पूर्व भागात स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
...