मध्य प्रदेशातील दतिया येथील खालका पुरा भागात पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका घराची भिंत कोसळल्याने रात्री झोपेत असताना एकाच कुटुंबातील 9 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून कसेबसे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
...