वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्याआधीच साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना 'आर्मी' असे संबोधले तेव्हा हा वाद निर्माण झाला. यावर श्रीनिवास गौर नावाच्या व्यक्तीने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अल्लू अर्जुनने 'आर्मी' हा शब्द वापरणे चुकीचे असून त्यावर आक्षेप घेतल्याचे गौर म्हणाले.
...