राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. उत्तर भारतातील पर्वतांवर बर्फवृष्टी होत असून मैदानी राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे लोक कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. दरम्यान, पावसासोबतच पुढील पाच ते सात दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
...