कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या विविध भागात लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक भागात तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट कायम आहे. पुढील काही दिवस थंडीचा हा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विशेषत: डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे तापमानात आणखी घसरण होऊ शकते.
...