बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने वादानंतर पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. भोजपूर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या निवेदनानुसार, पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली.
...