एम्समध्ये एका व्यक्तीच्या डोळ्यातून शस्त्रक्रियेद्वारे एक इंचाचा परजीवी काढण्यात आला आहे. भोपाळच्या एम्सच्या डॉक्टरांनी मध्य प्रदेशातील रुसल्ली येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यातून जिवंत परजीवी यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. या व्यक्तीला अनेक दिवसांपासून डोळ्यात त्रास होत होता. त्याची दृष्टी कमजोर होत चालली होती आणि त्याचा डोळा अनेकदा लाल पडत असे.
...