बांग्लादेशातील मैमनसिंग आणि दिनाजपूरमध्ये दोन दिवसांत तीन हिंदू मंदिरांतील आठ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. 'डेली स्टार' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका मंदिरात झालेल्या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाविरोधात सातत्याने घटना समोर येत आहेत आणि या ताज्या घटना आहेत.
...