कानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश मिश्रा यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सांगितले की, 2020 मध्ये त्यांनी जरीब चौकी येथील श्री तिरुपती ऑटो एजन्सीकडून 17 लाख रुपयांची स्कॉर्पिओ कार खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा मित्रांसोबत लखनौहून कानपूरला येत होता. दाट धुक्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली, त्यामुळे अपूर्वाचा जागीच मृत्यू झाला.
...