उत्तर प्रदेशातील अमरोहाच्या कुआ खेरा भागात जमिनीच्या वादातून जमावाने कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आईआणि मुलगा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 8 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या फुटेजमध्ये दोन वृद्ध व्यक्ती त्यांच्या अंगणात बसलेले दिसत आहेत, त्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांच्या एका गटाने काठ्या आणि बंदुका घेऊन आत घुसून निर्घृण हल्ला केला.
...