राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका 15 वर्षीय तरुणीने सामूहिक बलात्कारानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामगढ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावात ८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. एएसआय भोलाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी तिच्या मेव्हण्यासोबत शेतात गेली होती, जे नंतर तिला एकटी सोडून घरी परतले. लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार, संधीचा फायदा घेत दोन स्थानिक लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे रेकॉर्ड केली.
...