⚡मैत्री करण्यास दिला नकार, अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, राजस्थान येथील घटना
By Pooja Chavan
राजस्थानच्या उदयपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी 15 वर्षीय मुलीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलगी घरातून बेपत्ता होती त्यानंतर तीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.