सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांचा आगामी चित्रपट युद्ध हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, निर्मात्यांनी नुकतेच त्याचे पहिलेगाणे "साथिया" रिलीज केले, यात दोन्ही कलाकारांची उत्तम केमिस्ट्री दिसून येत आहे. हा हाईप कायम ठेवत आता ‘सोनी लगडी’ चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे पंजाबी गाणे गायक जॅझ धामी आणि सोन्ना रेली यांनी गायले आहे.
...