अक्षय कुमार, संजय दत्त, अनिल कपूर आणि रवीना टंडन अभिनीत आगामी विनोदी चित्रपट 'वेलकम टू द जंगल'च्या निर्मात्यांनी ॲक्शन सीनसाठी 200 घोडे वापरले आणि त्यासाठी अनेक घोडेस्वारांना बोलावले. सात दिवसांच्या शूटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, लोणावळा आदी ठिकाणांहून हे घोडे आणण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्मात्यांनी 10 एकर जागेवर मोठा सेटही तयार केला आहे.
...