अलीकडेच सलमान खानबद्दल स्फोटक खुलासे करून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि समाजसेविका सोमी अलीने आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. Reddit वर तिच्या #AskMeAnything सत्रादरम्यान, सोमी अलीने विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सोमी अली म्हणते की, सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड म्हणून ओळखले जाणे हा तिचा 'सर्वात मोठा शाप' आहे; ‘तो लोकांना माझ्याशी बोलू नकोस असे सांगत राहतो’, असा दावा अभिनेत्रीने केला आहे.
...