राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सत्या' हा कल्ट क्लासिक चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. १९९८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालेला हा क्राइम-ड्रामा चित्रपट भारतीय सिनेमासाठी मैलाचा दगड ठरला. त्याची कथा आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डचे अस्सल सादरीकरण यामुळे सिनेसृष्टीत त्याला विशेष ओळख मिळाली. चित्रपटात जे.डी. चक्रवर्ती, मनोज बाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर यांच्या उत्तम अभिनयाचे कौतुक झाले.
...