सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला आयसीयूमधून नॉर्मल रूममध्ये हलवण्यात आले आहे. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ नीरज उत्तमणी यांनी माध्यमांशी बोलताना सैफ अली खानबद्दल माहिती दिली आहे. सीओओ नीरज उत्तमणी यांनी सैफ अली खानला खरा हिरो म्हटले आहे. त्याने सैफच्या तब्येतीबद्दल सांगितले की, तो आता ठीक आहे.
...