बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर पुन्हा एकदा सिनेप्रेमींना चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रणबीर नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपट 'रामायण'मध्ये भगवान राम आणि परशुराम यांची भूमिका साकारणार आहे. ही दुहेरी भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरू शकते.
...