चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. रजनीकांत यांना गेल्या सोमवारी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. "अभिनेत्याच्या हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिनीत सूज आली होती आणि त्याच्यावर ट्रान्स-कॅथेटर पद्धतीने उपचार करण्यात आले," असे रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
...