सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर स्टारर 'परम सुंदरी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. दिनेश व्हिजन प्रस्तुत हा चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला आहे. ही रोमँटिक प्रेमकथा पुढील वर्षी २५ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा उत्तरेकडील मुलगा आणि दक्षिणेतील मुलगी यांच्यातील अनोख्या नातेसंबंधावर आधारित आहे.
...