सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान 'नादानियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर दिसणार आहे. हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यात इब्राहिम आणि खुशी फ्रेश आणि एनर्जेटिक जोडी च्या भूमिकेत आहेत. चाहते या डेब्यू सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इब्राहिम आणि खुशी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
...