टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आशा भोसले यांची नात झनाई भोसले यांच्या डेटिंगच्या अफवांना तेव्हा वेग आला जेव्हा सिराज झनाईच्या 23 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला. झनाईने तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती सिराजसोबत दिसली होती, ज्यामुळे या दोघांमध्ये काही खास आहे का, असा अंदाज चाहत्यांना आला होता. मात्र, झनई भोसले यांनी या अफवांना पूर्णविराम देत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत सिराजला 'माझा लाडका भाऊ' म्हटले आहे.
...