महाकुंभ 2025 दरम्यान बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी अधिकृतरित्या निवृत्त झाली आहे. किन्नर आखाड्यात भव्य पारंपारिक समारंभात त्यांना 'महामंडलेश्वर' हा दर्जा प्रदान करण्यात आला असून यावेळी ममतांनी आपले नवे नाव 'श्री यमाई ममता नंद गिरी' स्वीकारले. मिळालेल्या माहितीनुसार, ममतांनी शुक्रवारी प्रयागराजच्या संगमावर पिंडदानाचा विधी केला, त्यानंतर आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आशीर्वादाने त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर घोषित करण्यात आले.
...