चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबईतील पाली हिल येथील तिचा बंगला अवघ्या 32 कोटींना विकला आहे. बंगला विकण्यामागची तिची मजबुरी सांगितली असून तिने तो आलिशान बंगला का विकला त्याचे कारण समोर आले आहे. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'माझा चित्रपट इमर्जन्सी रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी मी माझी सर्व वैयक्तिक मालमत्ता गुंतवली होती. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.
...