बॉर्डर हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. दरम्यान, बॉर्डर2 ची प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'बॉर्डर २' चित्रपटाचे चित्रीकरण झाशीत सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे वरुण धवन देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार, निधी दत्ता, शिव चनाना आणि बिनॉय गांधी हे या चित्रपटाशी सह-निर्माते म्हणून जोडलेले आहेत, तर अनुराग सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
...