20 मे रोजी बेंगळुरू येथील फार्म हाऊसवर आयोजित रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या दोन तेलुगू अभिनेत्रींच्या रक्त तपासणी अहवालात अमली पदार्थ सेवनाची पुष्टी झाली आहे. पोलिस सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, "बेंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक्स सिटी परिसरात असलेल्या जीएम फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत सहभागी झालेल्या 98 लोकांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. अहवालात 86 लोकांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचे आढळून आले आहे.
...