छत्तीसगडमधील बिलासपूर येथून चोरीची घटना समोर आली आहे. एक चोर कुऱ्हाडी घेऊन एटीएमपर्यंत पोहोचला होता. मात्र अनेक प्रयत्न करूनही चोरी करता न आल्याने त्याने कुऱ्हाडीने एटीएमची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोपका तलावाजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली.
...