बांग्लादेशात या आठवड्यात झालेल्या हिंसक घटनांमध्ये चित्रपट निर्माता सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांच्या दुःखद मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. संतप्त जमावाने सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांना बेदम मारहाण केली. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सलीम आणि शांतो खान त्यांच्या गावातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना बलिया युनियनमधील फोर्काबाद मार्केटमध्ये संतप्त जमावाचा सामना करावा लागला.
...