प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला भाविकांनी हजेरी लावली आहे. अनेक व्हायरल क्षणांमधून 'साध्वी'च्या वेशातील एका तरुणीने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या क्लिपमध्ये ही महिला कुंभमेळ्यातील उपस्थितांशी संवाद साधताना दिसत आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिने एका साध्वीचे आयुष्य स्वीकारले होते. मात्र नेटकऱ्यांनी वेगळीच कहाणी उलगडली. आहे. हर्षा रिचरिया (वय ३०) असे या महिलेचे नाव असून ती अँकरिंग, भक्तीअल्बममध्ये अभिनय करणे आणि इन्स्टाग्रामवर जीवनशैली आणि अध्यात्माशी संबंधित व्हिडीओ बनवते.
...